मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना

माझी लाडकी बहीण योजना
Online Apply

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना-पात्रता

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी खालील अटी पूर्ण केल्या पाहिजेत:

  • अर्जदाराचे वय २१ ते ६५ वर्षे दरम्यान असावे.
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा निवासी असावा.
  • योजना अंतर्गत लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
  • लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  • राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  • पात्रता निकषांमध्ये बदल होऊ शकतात, त्यामुळे अधिकृत मार्गदर्शक किंवा स्थानिक अधिकार्‍यांशी संपर्क साधून ताज्या माहितीची खात्री करणे चांगले आहे

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना-अपात्रता

  • ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
  • सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  • ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना-आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • अधिवात/जन्म प्रमाणपत्र
  • पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेलतर उत्पन्न प्रमाणपत्र लागेल.
  • अर्जदाराने हमीपत्र
  • बँक पासबुक ( आधार लिंक असलेले बँक खाते असावे.)
  • अर्जदाराणा फोटो

अर्ज करण्यापूर्वी ची तयारी

  • आधार कार्ड : महिलेचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • अधिवास /जन्म प्रमाणपत्र: १५ वर्षापूर्वीचे पुरावे म्हणून या पैकी एक १)रेशन कार्ड २. मतदान ओळखपत्र ३. जन्म दाखला ४. शाळा सोडल्याचा दाखला.
  • महिलेचा जन्म परराज्यात असल्यास पतीचे कागदपत्रे: १५ वर्षापूर्वीचे पुरावे म्हणून या पैकी एक १)रेशन कार्ड २. मतदान ओळखपत्र ३. जन्म दाखला ४. शाळा सोडल्याचा दाखला.
  • उत्पन्न दाखला: पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड नसेल तर उत्पन्न दाखला लागेल.
  • नवविवाहितेच्या बाबतीत पतीचे कागदपत्रे : १५ वर्षापूर्वीचे पुरावे म्हणून या पैकी एक १)रेशन कार्ड २. मतदान ओळखपत्र ३. जन्म दाखला ४. शाळा सोडल्याचा दाखला

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना- अर्जामध्ये काय-काय विचारलंय?

  • अर्ज प्रक्रिया
  • मूलभूत माहिती:-
  • महिलेचे आधारकार्ड प्रमाणे पूर्ण नाव:
  • पतीचे नाव:
  • महिलेचे लग्नापूर्वीचे नाव:
  • वैवाहिक स्थिती:
  • जन्म तारीख (दिनांक / महिना / वर्ष):
  • आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का?:
  • अर्जदाराचा सध्याचा पत्ता आणि इतर माहिती:-
  • अर्जदारचा संपूर्ण पत्ता:
  • पिनकोड:
  • State:
  • जिल्हा:
  • तालुका:
  • गाव / शहर:
  • महानगरपालिका / नगरपालिका:
  • वॉर्ड:
  • मतदारसंघ:
  • मोबाइल नंबर
  • आधार कार्ड नंबर
  • शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का?:
  • बँकचे पूर्ण नाव:
  • बँक खाते धारकाचे नाव:
  • बँक खाते क्रमांक:
  • IFSC कोड:
  • आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का? (जर आपले बँक खाते जोडले नसेल तर आधारशी जोडून घ्या.):
  • अपलोड केलेली कागदपत्रे:-
  • आधार कार्ड समोरील बाजू:
  • आधार कार्ड मागील बाजू:
  • अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला / 15 वर्षे पूर्वीचे रेशन कार्ड / 15 वर्षे पूर्वीचे मतदार ओळखपत्र (यापैकी कोणतेही एक):
  • केशरी रेशनकार्ड किंवा पिवळे रेशनकार्ड समोरील बाजू:
  • केशरी रेशनकार्ड किंवा पिवळे रेशनकार्ड मागील बाजू:
  • अर्जदारचे हमीपत्र (हस्ताक्षर करुन अपलोड करा):
  • बँक पासबुक:
  • अर्जदारचा फोटो: